तो असतो दूरदेशी
आपल्या बायको मुलासकट
आपल्याच संसारात
आपल्याच मस्तीत
आपलाच क्रूस घेऊन खांद्यावर
चालत असतो पायाखालची
अनोळखी वाट ..!!
कधी कधी अवघड वाटते हे जगणे
हे बहरणे
हे बेधुंद जगणे
आठवण येते कधीकधी घराची
परसदारची
मागे असलेल्या तुळशी वृन्दावनाची
कशे असते तेथे जगणे..?
राहणे ..?
खरेच अवघड वाटू लागते हे सगळे
[कधी कधी बायकोशी केलेली धुसफूस]
हताश होऊन जातात हे सर्व क्षण
तीव्र आठवण येते घराची
भावंडांची
नसलेल्या बाबांची
असलेल्या आईची
परवाच आई म्हणाली होती :कधी येणार आहेस रे तू …?
आता मला देवाची हाक ऐकू येऊ लागलिय [!!]
तुला सुख द्यायचे राहून गेलेय
मी चांगली होते
नि तू परदेशी निघून गेलास
मी सुन्न होऊन गेले होते
तुझ्या परदेशी जाण्याने... !!
नि तुला डोळे भरून बघायचे राहून गेले होते
आणि असे प्रत्येकवेळेस होते बघ
मी सुन्न होते नि
तुला
तुझ्या संसाराला
बायको पोराला डोळे भरून बघायचेच राहून जाते
हे सगळे ऐकून काळीज गलबलून गेलेय
त्याला जायचेय भेटायला
आज ,उद्या करता करता दिवस जातोय हरवून
खरेच विसरून जातोय जाणे
प्रथम प्रथम किती बोलत होता नेटवर
मग कधीतरी कामाच्या गुंत्यात
बोलणे कमी होऊन गेले
आज ,उद्या करता करता दिवस जातोय हरवून
खरेच विसरून जातोय जाणे
गुरफटून गेलाय संसारात
मुलाच्या शाळेत
प्रथम प्रथम किती बोलत होता नेटवर
मग कधीतरी कामाच्या गुंत्यात
बायको पोराच्या नादात
स्वताच्याच काळजीत
बोलणे कमी होऊन गेले
खरे म्हणजे न बोलताही खूप बोलता येते
आणि बोलता बोलता
मन कोठेतरीच हरवून जाते
सगळे तुटत तुटत नि हरवून जाते ....
असे कसे होते ....?.
...