जराशी किंचित

जराशी  किंचित, तिरकी झुकून
एक झंझावात पायाला बांधून.
 
जराशी  किंचित, तिरकी  नजर
माझा "वाकणं" सार्थक  म्हणून.

जराशी  किंचित, श्वास रोखून
तुझा उभार, निरखतो दूरून.

जराशी  किंचित, तुझी खळी
माझ्या उपरोक्ष, जाते विरून.

जराशी  किंचित, तुला स्पर्शलेली हवा
माझं गलबत , देते  बुडवून.