मुक्ति
नको मला मुक्ती
दे जन्म पुन्हा पुन्हा
जरा कळु तरी दे
असा काय केला गुन्हा
कळू दे स्त्रिभ्रुणाचि व्यथा
कळू दे आतडे मायेचे
कळु दे वांझोटिचा पान्हा
असा काय केला गुन्हा
कळू दे बापाची तळमळ
कळू दे पोरांची होरपळ
कळू दे जगण्याची संकल्पना
असा काय केला गुन्हा
कळू दे बाल मजुरांच्या व्यथा
कळू दे लैंगिक शोषणा
कळू दे पुढारयांच्या वल्गना
असा काय केला गुन्हा
नको तो नरक
नको त्या यमयातना
त्या पेक्शा देवा
दे जन्म पुन्हा पुन्हा
लक्ष चौरयाऐंशी हजार योनी
नंतर काय करशिल देवा
कंटाळून देशिल जर मुक्ती
हा कोणाचा गुन्हा???
राजेंद्र देवी.