एक संध्याकाळ अशी....,
गजबजाटात हरवलेली ।
गप्पा-टप्पांमध्ये मित्रांसोबत,
हसत-खेळत घालवलेली ।
एक संध्याकाळ अशी....,
दुःख सारे ते विसरलेली ।
सुखद साजिऱ्या क्षणांनी,
तुडूंब भरून वाहिलेली ।
एक संध्याकाळ अशी....,
डोळ्यां मध्ये ह्या साचलेली ।
मिटूनयेत म्हणता डोळे,
गालावरून खाली ती ओघळलेली ।
एक संध्याकाळ अशी....,
खाण्या-पिण्यात गुंतलेली ।
टेर खेचत एक-मेकांची,
हास्य-विनोदात गुंगलेली ।
एक संध्याकाळ अशी....,
रंगात साऱ्या ह्या रंगलेली ।
रंगसंगतीत मिसळून असे हे,
चित्र देखणे हे साकारलेली ।
एक संध्याकाळ अशी....,
सरता-सरता थांबलेली ।
पुन्हा येईल का..? अशी ती,
प्रश्नावर अडून ह्या राहिलेली ।
एक संध्याकाळ अशी....,
संपूच नयेशी वाटलेली ।
संपल्या वरही मनात माझ्या ।
रेंगाळत अशी ती राहिलेली ।
हर्षद अ. प्रभुदेसाई.....