वरणफळे (चकोल्या)

  • तुरीची डाळ दीड वाटी, भाजलेले खोबरे आणि लसुण (मिक्सरवरुन काढुन)
  • गोडा मसाला, चिंच (आमटीला घालतो त्याप्रमाणे), गुळ, मीठ चवी प्रमाणे,
  • वरुन घालायला कोथिंबीर आणि तुप. तेल आणि फोडणीचे साहित्य,
  • कणिक - त्यात मीठ, हळद, हिंग,थोडेसे तिखट घालुन घट्ट मळुन घावी.
३० मिनिटे
चार लोक

प्रथम तुरीची डाळ शिजवुन घ्या. नंतर तेलामधे राई, जिरे, हिंग, हळद व वाटलेले खोबरे आणि लसुण घालुन शिजलेली डाळ जरा घोटुन घेउन फोडणीत घालावी. मग त्यात पाणी घालुन चिंचेचा कोळ , गुळ, मसाला, मीठ घालावे,
चांगली उकळी आली की त्यात मळलेल्या कणकीच्या पोळ्या लाटुन घेउन
शंकरपाळ्याच्या आकारचे तुकडे करुन घालावेत.

चांगले शिजले की   सर्व्ह करावे.

ह्या मध्ये वरून भर्पुर साजुक तुप घालून खावे.

ह्या सोबत भाजलेला पापड छान लागतो.

आईकडून