पंख दिलेत तर उडले पाहिजे
मग घर सोडले पाहिजे
क्षितीज पार करताना
सारे विसरून गेले पाहिजे
पंखात त्राण आहेत
फुफुसात प्राण आहेत
प्रत्येक श्वासा बरोबर
सूर छान लागून आहेत
जे उंच उडतात
तेच आभाळ बघतात
निळ्या निळ्या रंगाचे
मस्त गाणे गातात .....
जी पाखरे उडू शकतात
त्यांचे जरूर कौतुक करा
जे उडत नाहीत
त्यांचे देखील आभार माना
पंख असून जे उडत नाहीत
त्यांचे छान घरटे असते
पहाटे पहाटे बांग देणे
हेच त्यांचे गाणे असते
उडता येत नाही म्हणून रडत नाही
मान टाकून बसत नाही
ते सुद्धा मस्त जगतात
आपले गाणे गात बसतात ....!!