एखादी कविता वाचली कि...

एखादी कविता वाचली कि, माझं मन म्हणत तूही कविता कर..
मनातल्या तुझ्या भावना,  शब्दांत व्यक्त कर..
नव्याचे नऊ दिवस असतात, तसा मीही नऊ मिनिट विचार करतो..
भाषेच्या या समुद्रात शब्दांचे मोती शोधतो..
कितीही बुडी मारली तरी मोती काही सापडत नाही..
कवी होण्याचा माझा प्रवास पुढे काही सरकत नाही..