आई

घरट्याच्या ओढीने जात असतात सारी

पाहून ते दृश्य माझ्या कळ उठे अंतरी

सुसह्य कितीतरी रखरखता ग्रीष्मताप

परी नको ग असा घर दुरावल्याचा शाप

जेव्हा पडते एकली या दुनियेच्या बाजारात

आई तुझ्या आठवाने कढ दाटून येतात

जरी मिळे धन मान वाटे सारेच अपुरं

सर्व सुखात ग थोर तुझ्या मायेची पाखर

                                      - अनुराधा कुलकर्णी