"कलमाडीची उडी"
अरे अरे कलमाडी ।
कशी मारली हो उडी ।
धड राहिले ना"हात"।
नच उरली तंगडी॥ध्रु॥
खोटे किती हो बोलला ।
किती कांगावा हा केला ।
परी सत्य आज आले।
किती घोटाळा हो केला।
कोणी थुंके अंगावरी।
कोणी मारी तुम्हा जोडी॥१॥ध्रु॥
छापा पडता हो घरी।
नाही कोठे सापडला।
आव आणूनी 'साव'चा।
जनामध्ये हो फिरला।
आज आली वेळ तुम्हा।
हाती पडे हाथकडी॥२॥ध्रु॥
आता द्यावा राजीनामा।
क्लुपत्या नाही येत कामा।
संपे तुमचा जमाना।
जावे आता'कारा'धामा।
सोडून द्या तुम्ही आता।
सारी बाते बडी बडी॥३॥ध्रु॥
अनंत खोंडे.
८।५।२०११.