स्वप्नराणीस

कमलपाकळ्यांसम तव मृदुतम बाहूत

मला तू मिटव ना

झोप येत नाहीय मला

मला तू झोपव ना

होतच नाही बंद खट्याळ डोळे

अमृतओठ ठेवून त्यावर आपले

त्यांना तू झाकव ना

मला तू झोपव ना

शीणले आहे तन नि मन तरी

निद्रा टाकून गेली मला

मग तूच नाही का अशा वेळला

कुशीत उचलूनी घ्यावे मजला

प्रेमकहाणी हळुवर कुठली

सांगत सांगत थोपट ना

मला तू झोपव ना

निद्रेविण कशी मी येऊ ?

वदू नकोस असे स्वप्नराणी

माझे मीपण घेऊन तू

सर्वच खोटे ठरव ना

मला तू झोपव ना

---------------