बघता बघता यौवनाच्या आले मी कड्यावर
पुढे जायचे नसले तरी जावेच लागणार
काय जोम तो, रग केवढी, केवढी ती ताकद
कसा नकळत निसटून गेला तारुण्याचा मद
मानेना परी मन हार ही, यौवनीच रेंगाळी
छे छे उभा ताठ मी की हो, वाकेन का कधीकाळी?
वाकायाचेच नाही नुसते, जायाचे उन्मळून
मनोमनही अशी कबुली देई ना परी मन..!