तो आणि ती

आज ११ फेब्रु, पुन्हा तिच्या आठवणीने त्याचे मन दाटून आले. ऑफिस मध्ये मित्र -मैत्रिणीच्या आणि कामाच्या गराड्यात तो अडकलेला तरीही तो एकटा होता. मित्र -मैत्रिणी व्हॅलेंटाइन डेच्या गडबडीत होते, कुणाला तरी सरप्राइज गिफ्ट द्यायचे होते, तर कुणाला तरी आपल्या नवऱ्याला इम्प्रेस करायचे होते.ह्या सर्व गडबड गोंधळातही तो एकटा होता ..शांत होता .. सर्व काही ओल्या डोळ्यांनी बघत होता, पण आतून बोचणाऱ्या भावना त्याचे लक्ष कशातच लागू देत नव्हत्या.तो एवढ्या गोंधळात राहूनही एकटा होता.
त्याला कारणही तसाच होत,आजपासून बरोबर ३ वर्षांपूर्वी त्याच्या आयुष्यात ती आली होती.
तो : सर्वांमध्ये लाडका असणारा,सर्वांना सांभाळणारा,सर्वांची काळजी करणारा,सर्वांना काळजीने विचारणारा असा तो.सगळ्या गोष्टी पॅशनेटपणे करणारा.. स्वतःचं करिअर सांभाळणारा ...सगळ्या गोष्टी करायला एका पायावर तयार..आणि ह्याचा हो असणारच असाच सगळे मानायचे..घरापासून लांब पण कधी कुणापासून दूर नाही गेला... असा तो ...
आयुष्यात आपण कधी प्रेम वगैरे काही करू हि कल्पना त्याच्या डोक्यात कधी आलीच नाही कारण त्याला माहित होता कि प्रेम वगैरे जर आपण केलाच तर ते इतका पॅशनेटली करू कि त्याला कुठलाही बंध राहणार नाही आणि त्याला आयुष्यात बंधन हि होतीच...
'दिल चाहता है' हा आवडता मूव्ही त्यात आमीर ला नाही म्हणता म्हणता प्रेम झालं... आपल्यालाही असा काही होईल असा विचार त्याच्या मनाला कधी हि शिवला नाही..
ती : स्वतःच्या करिअर मध्ये गुंग असणारी ..सर्वांना समजून घेणारी..स्वतःच्या आयुष्यात किती सारे प्रॉब्लेम्स होते पण ते प्रॉब्लेम्स कधीही कुणाला न सांगणारी.. कधीही स्वतःहून डिस्कस न करणारी .. हॅपी गो लकी अशी ती..
प्रेम कशाबरोबर खातात हे तिलाही माहित नव्हत..पण आयुष्यात सगळ्या गोष्टी अनुभवायच्या हा तिला भारी छंद. दारू पिऊन माणूस काय फील करतो हे तिला प्रॅक्टिकली अनुभवायचा होता असा विचार करणारी ती..
सॉफ्ट माइंडेड .. इतकी कि जगात दुखी मानस का आहेत व त्यांचा दुःख आपण कसा कमी करू शकतो हा विचार करणारी ..स्वतःच दुःख लपवता लपवता आणि आपला आयुष्य सॉल्व्ह करता करता जगणारी अशी ती ..
१४ फेब्रुवारी .. आज पासून बरोबर २ वर्षापूर्वी त्याला तिचा फोन आला नेहमीप्रमाणे तिने त्याच्याशी गप्पा मारल्या .. पण आज असा का होत होता कि ती त्याच्याशी सगळ्या गोष्टी शेअर करत होती ज्या गोष्टी तिने त्याला कधीच सांगितल्या नव्हत्या .. त्या गोष्टी ऐकून त्याला अतीव दुःख झाले..त्याला हि गोष्ट समजताच नव्हती कि इतकी चांगली असणारी ती .. तिच्या आयुष्यात असा काही असाव आणि तिच्या आयुष्यात असा
दुः ख का असावा हे त्याला मान्यच नव्हत..तिला ह्यातून बाहेर काढायचा आणि तिच्या जीवनाला नवीन अशा मिळवून द्यायची हा निर्धार त्याने मानाने केला..रोज तिच्याशी बोलून तो तिचा दुःख हलका करू लागला..तिने सतत हसावं . तिने ह्या सर्व अडचणीतून मार्ग काढावा हि त्याची इच्छा ..तो तिला ह्यासाठी लागेल ती मदत करू लागला.. तिला हि कुणाचा तरी आधार मिळाला म्हणून ती खूश होती.. असा सगळा एकदम सुरळीत चालला होता... असाच सगळ्या गोष्टी एकमेकांना सांगू लागले ... आणि एक चांगले मित्र म्हणून जवळ येऊ लागले .. पण आपण प्रेमात पडलो आहोत का हि भावना तिच्या मनाला अजून तरी शिवली नव्हती..
पण तो ..कुणी एक मुलगी माझ्या आयुष्यात आली आणि आपण तिच्या आयुष्यातला एक अविभाज्य अंग बनलो हि भावना त्याच्या मनाला खूप सुखावत होती..त्याचा अंतर्मन त्याला सांगत होता कि तू प्रेमात पडला आहेस .. पण त्याच्या बाह्यमनाला ह्या गोष्टींचा थांगपत्ता पण लागत नव्हता म्हणून त्याचा बाह्यमन त्याला हि गोष्ट मान्यच करू देत नव्हत... आणि ह्या दोन्ही मनांच्या द्वंद्वा मध्ये तो अडकलेला होता ..
असच दोघा मधला अंतर मानाने कमी होत होता..असाच एक दिवस ते दोघेही एकमेकांना भेटले .. दोघे हि खूश होते.. आनंदाने एकमेकांच्या हातात हात घालून फिरत होते आनंदाने गप्पा मारत होते.. कधी कधी ती त्याच्या इतक्या जवळ येत होती कि तिचे श्वास सुद्धा त्याला जाणवत होते ..त्या श्वासांनी आणि त्या स्पर्शाने तो बेचैन होत होता... अशी बेचैनीची भावना मनात का येत आहे ..ह्याचे उत्तर त्याला काही केल्या कळत नव्हती..पण एक भावना त्याच्या मनात दृढ झाली कि आपण प्रेमात पडलो आहोत......
पण तिच्या मनात कुठल्या भावना आहे त्याला काही केल्या कळत नव्हत्या ..तिचा तो अलगदसा स्पर्श... आधारासाठी धरलेला हात ..पडण्याच्या भीतीने बिलगलेल्या हातांचा स्पर्श.. ह्या सर्व गोष्टी त्याचा मन विचलित करत होत्या..
काय करावा? कसा सांगावं? ह्या सर्व चिंतनी त्याचा मन ग्रासला होता..तिचा तो अवखळपण बघून हि आपल्याला चुकीचा समजेल का?? ह्याने त्याचा मन घाबरत होता...
परतीच्या प्रवासात दोघे जवळ जवळ बसलेले होते ... हातात हात होते...त्यांची नजर बऱ्याच गोष्टींचा वेध घेत होती...ती आपल्या आयुष्यातल्या गोष्टी सांगत होती...हा तिला मी कायम सोबत असणार ह्याची ग्वाही देत होता...
आणि तिचे डोळे अचानक पाणावले ह्याने तिला समजावलं आणि शेवटी तिला रडण्यासाठी त्याच्या खांद्याचा आधार मिळाला.. त्याने समजावता समजावता आणि एकमेकांजवळ बसता बसता.. परतीचा प्रवास संपला..
त्या प्रवासात दोघांनीही एकही शब्दाने संवाद केला नव्हता पण त्यांच्या मानाने अखंड प्रवास करून संपूर्ण संवाद साधला होता..
उतरताना तिने दिलेला मंद हास्य बघून तोही हसत होता..ती नॉर्मल झालेली होती...तर्र पुन्हा आयुष्यात कधीही गरज पडली तर मी उभा असणार ह्या भावनेने तो हि हसत उभा होता..हे करताना त्याने मिठी मारण्यासाठी आपला हात पुढे केला..तिनेही मंदसा प्रतिसाद देऊन त्याच्या मिठीत ती सामावून गेली.. पुढे त्यांच्या नजरेनेच संवाद साधला.. आणि बघता बघता त्यांचे अंतर मानाने आणि शरीराने कमी झालेले होते..दोघे एकमेकांना बघताना इतके गुंग झाले होते कि.. त्यांच्या ओठांनी एकमेकांना केव्हा स्पर्श केला हे दोघांनाही समजलेच नाही...!!!
डिस्टन्स बिटवीन देम वॉज सो क्लोज दॅट नोबडी नोज हू टुक द इनिशिएटिव्ह.....
आज ह्या गोष्टीला खूप वर्ष झाली आहेत...दोघेही आपल्या आपल्या आयुष्यात खूप खूश आहेत...आणि आज त्यांच्या आयुष्यात त्यांनी जवळपास सगळ्या गोष्टी संपादन केल्या आहेत...आयुष्य जगताना ते एकमेकांच्या जवळ आले एक सुंदरसा आयुष्य जगलेत...
आज सुद्धा दोघे एकमेकांना भेटतात... एकमेकांशी गप्पा मारतात...आणि एकमेकांना समजून घेतात....
त्यांना पहिला तर संदीप खरे ने केलेल्या काव्यपंक्ती त्यांच्यासाठी एकदम समर्पक आहेत..
भेट जरी न ह्या जन्मातून , ओळख झाली इतकी आतून..
प्रश्न मला जो पडला नाही, त्याचे हि तुज सुचते उत्तर ..
कितीक हळवे कितीक सुंदर,किती शहाणे आपले अंतर !!!
ते कोण होते?? ते एकत्र का नाही राहू शकले ?? ... ह्या सर्व गोष्टी त्यांना पहिला तर आज तरी एकदम न्यून वाटतात.....कारण कुणी तरी म्हटलंच आहे प्रेम म्हणजे मिळवणं नव्हे तर एकमेकांसाठी केलेला त्याग असतो ..
तो आणि ती...