अनुभवाची जोड

अनुभवाची जोड फक्त

आजला आहे

उद्याची नवलाई त्याला

अजाण आहे

का केस हे पांढरे

मिरविती घालूनी लाल कपडे ?

नव्याला मिळतात मात्र

फाटके जोडे

रामन आणि जगदीशचंद्र

हे का विसरता?

नवीन विचार ऐकुनी

का बिचकता ?

सानुला आधार तुमचा

आता मागत आहे

बाळ ते आता जणू

रांगू पाहताहे  

बोट द्या फक्त तुमचे

उभे राहण्या त्याला

विहरणे शक्य आता

अथांग आकाशी  त्याला