शेतातील पिकाबरोबर तणही वाढत असते
पिकाच्या वाढीसाठी ते उपटून टाकायचे असते
एरवी ओलसर बांधावर कावळ्याच्या छत्र्या उगवतच असतात
सर्वांच्या नजरेसमोर राजरोस वाढत असतात
काय उपटायचे काय वाढू द्यायचे हे आपणच ठरवायचे असते
पिकाची निकोप वाढ सर्वांकरता अवश्यक असते.