पंचवीस वर्षापूर्वी जेव्हा मी बाप होणार ही बातमी होती
आनंदाबरोबर जबाबदारीची मनामध्ये जाणीव होती
आई म्हणून मोहरताना गंमत हिला वाटत होती
मी बाप होण्यासाठी कळा तीच सोसणार होती
प्रत्यक्ष बाळंतपणात ही जेव्हा अवघडली होती
कळा ज्या लगल्या जीवा मला की ईश्वरा ठाव्या
अशी माझी स्थिती होती
आता मी आजोबा होणार या बातमीने मन आनंदात आहे
आज मै उपर जमाना निचे असे आकाशी विहरत आहे
बाप होण्यासाठी निदान मला काहीतरी करावे लागले होते
आजोबा होण्यासाठी मात्र मी काहीच केले नव्हते