बाजारात फिरताफिरता पुष्कळ गोष्टी दिसत असतात
आपली ऐपत असेल तशी त्यातल्या काही घेता येतात !
घेतलेल्या बहुतेक गोष्टींची आपल्याला गरजही असते
एक दोन गोष्टी मात्र आपली केवळ हौस असते !
न घेतलेल्या वस्तुंपैकी एखादी उगाच खुणावत असते
पण ती न घेण्यातच आपली खरी पत असते !