जादू...
जादू वळिव सरीची .... मातीत अत्तर सांडायची
जादू काळ्या ढगांची.... मनमोर फुलून यायची
जादू थेंबाथेंबांची.... दोन मने जुळायची
जादू लखलख वीजेची... घट्ट मिठीत मिटायची
जादू फास्ट राइडची.... बिलगत भुर्रS जायची
जादू खोडकर वाऱ्याची... रेशीमबटा उडवायची
जादू ओल्या ओठांची... ओठांनीच टिपायची
जादू साथीत भिजायची... पंख नसता उडायची
जादू चिंब क्षणांची.... मनात जपून ठेवायची