मन - वारू !

मनाच्या वारुचे , वळण असेच असते ,

कळतनकळत उधळायला लागते  १

शरीराला त्याच्या मागे,  फरफटत जावे लागते

हो नाही करता करता, त्याचीही सवय होऊन जाते  २

लगाम संस्काराचे त्यांना, धरून ठेवू पाहतात

कधी मन कधी तन उसळी तरीही मारत राहतात  ३

तसे शरीर खूपवेळा गप्प गप्प बसून राहते

संधीच्या खिडकीतून मन वाकुल्या दाखवत राहते .!

मन वाकुल्या दाखवत राहते  !!