गुन्‍हेगारी

तुझे नाव नाचती जुन्‍या बाजारी

माझे निघणे तिथून आहे गुन्‍हेगारी...

तुझी कहाणी मी कुणाला सांगावी

मी आहे शब्‍दांच्या घरी पगारी...

तुझ्‍या दुखासवे मी तुला कवेत घेतले

प्रथम तुझ्‍या दुखांचा आहे मी आभारी...

मी फकीर होऊन तिथे उभा होतो

दान देणारे होते एके काळी भिकारी...

तुझ्‍या महलात बोभाटा नेमका कश्‍याचा

दुख तर उभे आहे नेमके माझ्‍या दारी...

तु दुर निघाली चेहरा झाकून स्‍वताचा

फितुर होण्‍याची कला मला न परवडणारी...

पिंजरा तु उघडला मी उडुनी जावे म्‍हणून

तुझ्‍या कैदेतून सुटण्‍याची माझी नाही तैयारी...

रईसांच्‍या दारी कधी नाही मी गेलो

तरी म्‍हणतात ते, मी ईथला जुना जुगारी...

लाख वेळ्‍या तिने चकवा दिला तरी ही

माझी म्रूत्‍यू सवे उरली आहे जुनी उधारी....

---म्रणाल...