सूर राहू दे !

साध रे  

मना  तू सुस्वर साध रे

मना मनाला रेषीम धागे बांध रे  १

मेघातून मल्हार घे तू ,

गंधातून गंधार घे तू

पंचम घेऊन कोकिळेचा

दे सूरांना साज रे

मना  तू सुस्वर साध रे   २

तान आहे सूर्यकिरण

आलाप विशाल नीलगगन

धरेतून अंकूर येतो सहजसा

बांध असा तू राग रे

मना  तू सुस्वर साध रे   ३

परि सदा तू ध्यान दे

शुद्ध स्वरा सन्मान दे

असशील तू नसशील तू

स्वर अमर राहील रे

मना  तू सुस्वर साध रे   ४