रात्र काळी पावसाळी भावना उमलून येई
चक्षुरंध्रांपटलपाठी यातना अस्वस्थ कांही
थेंब पोटी वलयं मोठी काठ त्यांना ज्ञात नाही
तुंबलेले हो प्रवाही ना दिशा ना गोत त्यां ही
गुंतले रेशीमधागे गाठ पण पडलीच ना ही
स्पर्श हळवेला दंवाचा कमळदळ निर्लिप्त राही
स्थान परि त्यांचे जळातच श्वास श्वासांतून वाही
व्यापलेले अर्थ सोबत याच देही पण विदेही.. !!
.....................अज्ञात