=================
पिहू-पिहू, पावश्याचा
रानी गुंजला कानोसा..
कुहु-कुहु, कोकिळेचा
वनी घुमला संदेशा.....
ये रे, ये रे पावसा..
ये रे, ये रे पावसा.....!!
एक रुप, एक जीव
दूर क्षितिजाची रेषा..
घन दाट, घन नीळ
रंगी रंगल्या दिशा.....
थुई-थुई, नाचरासा
मनी मोर पिसारा..
उमलून तेज झाला
तनी गुलमोहरी फुलोरा.....
चराचरी साकारला
संकेत स्वागताचा..
आणि कसा सोडवावा
बाई नैऋत्यी उखाणा.....
ये रे, ये रे पावसा..
ये रे, ये रे पावसा.....!!
=================
स्वाती फडणीस ..... ०८०६२०११