सावली

सावली

मी तुझी सावली
सदैव तुझ्याच छत्राखाली
ना सोडली साथ कधी
घुटमळले सतत पायाखाली

घेतलेस ना कधी
मज तु माथ्यावर
भरभरून राहिले मी
सतत पायथ्यावर

दिवसा न सोडली साथ
रात्री पण राहिले दिव्याखाली
उजाडताच भिरभिरले
मि तुझ्याच भवताली

कधी झाले मोठी
तर कधी झाले छोटी
जर आहेतच या जन्माच्या गाठी
का धरतोस मजला वेठी