चार कविता

एक कावळा झाडावर

सोडवू पाहतोय 
उद्याचं प्रमेय
कारण आजचं 
वास्तव आहे 
वाळलेली घूस. 
एक ससा
म्हणतो स्वस्थ बसा
समाधिस्थ
बगळा जसा.
एक हत्ती 
करतो मस्ती
झाडझाडोरा उडवीत 
जिंकतो कुस्ती.
चिमणीच्या घरात 
दोनच काटक्या 
एक वाळलेली
एक ओली
तरीही पिलं चिवचिवतात 
कावळ्याला टाटा करतात.