पहिली धडक देऊन तु कुठे हरवलास,
तुझा आठव हुर हुर लावतो मनास,
सुकलेली माती शोधते आहे सुगंध,
सुकली झाडे हरवला फुलांचा गंध.
रस्ता ही भासतो कावलेला,
वाट बघून बघून थकलेला,
तो तर रात्री सुद्धा झोपत नाही!
म्हणतो तु कधिही येशिल तुझा काही नेम नाही.
पैसा देऊन देऊन पैसा झाला छोटा,
लहांनग्याच्या गाण्यातच तु हरवलास का मोठा?
बोबड्या प्रश्नांना उत्तर देता देता बोबडी आमची वळे,
काय तुझा ठाव ठिकाणा कोणास ना कळे.
ये रे, आता लवकरच ये,
पण येशिल तेव्हा मात्र वस्तिसच ये,
आमच्या पाहुणचाराचा तु मनसोक्त आस्वाद घे,
अन तुझ्या थेंबा थेंबात आम्हाला सामावून घे.