आनंदी आनंद गडे,
टि. व्हि. चे चॅनल्सच वाढे.
सासू सुना झगडती टि. व्ही. वरती,
पडसाद उमटे त्याचा आपुल्या घरटी,
भात करपुनी झाला काळा,
आमटी आटुनी झाला काढा.
मालिकेतल्या नायकाची बघून लफडी,
बायको माझ्यावरच रुसली,
म्हणे, बघा कसा तीन तीन लफडी करून निभावतो,
नहितर तुमचा तर मला सांभाळतानाच निभाव लागतो.
दादागिरि, गुंडगिरी म्हणे मालिकेतली मजा न्यारी,
आकलन करते आहे आजची पीढी सारी,
परवाच पिंट्या आला दुपारी, म्हणतो बाबा द्या हो एक सुपारी,
चिंट्याच्या भांडणाचा वचपा काढायचा आहे, पक्या भाईला दिलेली बरी.
कालच जुने कपडे काढले बोहारणिला देण्यासाठी,
तेवढ्यात पिंकी म्हणाली ते देऊ नका, राखून ठेवा माझ्यासाठी,
अजून १/२ वर्ष मी हेच कपडे घालीन, तिला पुसता कशासाठी?
म्हणे, रिअलिटी शोची अँकर वाटण्यासाठी.......
जुने चिमणराव, टिपरे आजोबा होते खरच आधार,
जीवनाची गणितं सोडवत, घेता विनोदाचा आधार,
राजा शिवछत्रपति, झाशीची राणी एक नमुना सुंदर,
या अशा मालिकांचा नका देऊ कधी अंतर....
चला धरू आग्रह अशा मालिकांचा,
जेणे करून उद्धार होईल सकल जनांचा......