संथ पाडते गझला बाई ....

(चाल :  संथ वाहते कृष्णामाई ....)

संथ पाडते गझला बाई -
गझलेवरच्या प्रतिसादांची जाणिव तिजला नाही |धृ |  संथ पाडते ....

कधी न कामें करी लौकर ती ,
कूर्मगतीने सदा करी ती ;
बॉसगिरीची काही पर्वा नाही तिज ठायी |१|  संथ पाडते ....

कुणी पुरे ना म्हणती गझला ,
कुणी वर्णिती उच्च गेयता ;
मात्रागणाची करून जंत्री - मोजित कुणी राही |२|  संथ पाडते ....

सतत चालते काव्य-टंकणी ,
होई न व्यनितुनी बाई शहाणी ;
वाचकास ही व्हावी कैशी , सांगा सुखदायी |३|  संथ पाडते ....