काकूआजी म्हणजे तुळशीचे झाड होतं
काही मागा नका मागू
प्रसन्न, हसरं, टवटवीत
केंव्हाही नमस्कार करा
मंजिऱ्याच सळसळणार
भेटलो की कोण आनंद
आवडतं डाळीच घुटं-भात
बाजारातून मिळेल ते,
परवडेल ते,
रायवळ आंबे, आवळे, काहीही
निरपेक्ष जीवन
'चांगले होईल जा' म्हणणारी
गजाननाच्या चरणी
सर्वांसाठी सुख मागणारी
भ्रमिष्ट झाली तरीही
चेहरा हसरा, प्रसन्न
ना तक्रार, ना तिरस्कार
मी नशिबवान,
माझ्या वाट्याला आली
ह्या तुळशीची सावली
गेली,
बघता-बघता गेली
शांतपणे..
लांब
खुप भोगले, खुप सोसले
पण, चेहरा नुकत्याच उमललेल्या
फुलासारखा,
किती फुलपाखरे भोवती
पण तीला जाणीवच नव्हती
ती गजाननाजवळ होती
मुक्त होत होती
ही तुळशीच्या मण्यांची माळ
स्पर्शताना, आजही
ती म्हणताना दिसते
'जा, चांगलेच होईल'
'जा, चांगलेच होईल'.