अंधश्रद्धेच्या भोवऱ्यात माणूस फसला आहे असा,
डोळस असूनही गांधारी बनून वावरतोय जसा...
चिमूटभर भुकटीने का कोणाचा आजार दूर होई,
गुण आला नाही तर मग दवाखान्यात नेई..
प्रयत्नांची केली पराकाष्ठा पण उशीर हा झाला,
तर म्हणे औषधोपचारानेच जीव गेला..
असे वागून माणसाचा विकास होणार कसा,
म्हणून अंधकार दूर करण्या घे विज्ञनाचा वसा...
म्हणे त्या बाबांचा चमत्कार लई भारी,
मंत्र टाकून पळवितो दुखे दूर सारी..
पण का हे ना कळे तुझ्या वेड्या मनाला,
त्याहून दुखे दूर होता का पारखा तु सुखाला..
सुख दुख हा तर आपल्याच मनाचा आरसा,
मग कधी सोडणार तु विचार हा पारसा...
कुठे असे नवसाचा बकरा कुठे धनप्राप्तीस्तव बळी,
अंधश्रद्धेच्या लोभापायीच चिरडली जाते ती मुकी कळी..
नाहक मारून दुसऱ्या जीवाला देव का कोणा प्रसन्न होतो,
अक्षम्य अपराधास्तव का तो धनवैभव देतो..
कष्ट कर तु स्वतः कर समंजसपणे प्रत्येक कृती,
तरच शक्य होईल तुझ्या इच्छा आकांष्यांची पूर्ती...