कालचा तू.....

कालचा तू, आज खूपच वेगळा भासलास..

आलास नेहमी प्रमाणे अचानकच..

पण, तुझा प्रेमाचा ओलावा,

अल्लड खोडकर स्पर्श आज मी शोधतोय....

               कालचा तु, आज खूपच वेगळा भासलास..

               बरसलास आभाळ फाटल्यागत.....

                कुठे हरवलं तुझं सुरात बरसणं,

                तुझ्या थेंबातला गारवा मी शोधतोय....

कालचा तु, आज खूपच वेगळा भासलास..

होतास त्यांच भिंतीवर टांगलेला....

स्वतःच्या रूपात, माझे रूप दाखवणारा तु,

आज इतका कुरूप का भासतोस.....

                                           तेव्हा तो त्वरित उत्तरला....

कालचा तो 'तु', आजचा तो नाहीच आहेस,

तो पोहचला त्या क्षितिजा पलीकडे

आजच्या काळापासून खूप दूर

निसर्गाच्या कुशीत विसावलाय कायमचा.......