भाव हृदयातील ओठां वाटे बाहेर पडले \
मिलन दोन जिवांचे डोळ्यांवाटे बहरले \
आज या कंठातुनी स्वर उमटले\
मनोमनी आनंदाचे धुमारे उधळले \\
आनंदाने सर्व निसर्ग हा शहारला \
जीवनात हा पारिजात आज फुलला \
दिवस आनंदाचा आज हा जाहला \
मनोमनी वसंत आज हा बहरला \\
नव्हे मिलन ते आकाश धरतीचे \
नव्हे ते समुद्र सरितेचे \
नव्हे ते दोन फुलांचे \
मिलन होते ते दोन जिवांचे \\