विरह

का कळेना विरह हा करमेना,

मनातल्या आठ्वणीना थारा का बसेना,

तुझ्या विरहात हृदयाची तार ही जुळेना

का कळेना विरह हा करमेना!!

असशिल जवळ मनी काही वाटेना,

दुर जाता मनी हुरहुर असेना,

सहवासात तुझ्या ना कोणी का भासेना,

का कळेना विरह हा करमेना!!

मनात आठ्वनीचे नाद संपेना,

ही मिलनाची आस असेना,

एकच खंत ती तुला कळेना,

का कळेना विरह हा करमेना!!

क्षणात वाटे तोडून बंधनाना,

संपवून सर्व नात्यांना,

या विरहाच्या बेड्यांना,

यावे सरळ तुझ्या मिलना,

का कळेना तुला,विरह हा करमेना.........