मी असा ....

मी असा बसलो जिवंत
मरणातिल चिवडीत खंत
पाहून आता रंग सगळे
निरंगी रंगात रंगले

मी असा  रंगांधळा
कृष्ण धवल चित्र जगतो
रंगांना तडीपार केले
बिचारे गुदमरून मेले

मी असा समाधान जगतो
जीवनातिल अंत पुरतो
भरले ताट हुगताना
राजाची ऐट आणतो

मी असा प्रेमात गुंग
तिजला कधी फुले आणतो
जवळ येताच मग ती
गंधात जगुनी मस्त मरतो

मी असा हा असा कसा
काय आहे माझा वसा
जीवनाचा टाकीत फासा
जगतो  भ्रमिष्ट पांगळी  आशा