ती

ती हवी मोहात पडायला
ती हवी जवळ असायला
ती हवी रागावणारी
आणि हक्काने मग मिठीत
घेऊन समजावणारी
 
तिच्या सावे परवा फुलावा
तिच्या असण्याने वसंत यावा
तिच्या कुशीत ग्रीष्म सरावा
तिच्या मिठीत मारवा गावा
 
ती हवी जन्मा साठी
ती हवी हक्का साठी
ती हवी अल्लड प्रेमासाठी
ती हवी गोड आठवाणीन साठी
 
प्रत्येकाला ती हवीच असते
तिच्यातल्या त्या 'ती' पणाला
आसुसलेले मन हळुवार डुलत जाते
मग निसर्ग अनुभवताना सुद्धा
तुच्या आठवणीत रमून जाते
 
ती हवी पावसात फिरायला
ती हवी मनतले गुज ओळखायला
ती हवी कोणी नसताना सुद्धा
ती हवी जागेपणी पाहिलेल्या स्वप्नात सुद्धा
ती हवी हातात हात धरून
आयुष्याची स्वप्ने पाहयला सुद्धा
 
ती अशी असेल
ती तशी असेल
कशीही असली तरी
तरी ती 'ती' असेल
ती 'ती' माझी असेल
 
तिच्या शिवाय आयुष्य म्हणजे
वातीशिवाय समई
क्रिकेट शिवाय सचिन
आणि देवाशिवाय देऊळ
 
तिच्या असण्याने जीवनाला अर्थ आहे
तिच्या असण्याने मनाचे कोडे शाबूत आहे
आणि अजूनही तिच्या प्रतीक्षेत
वसंत फुलतो आहे....