कसे जुळले नाते माझे मलाही नाही कळले ..........

माझे तुझे नाते जुळले
कसे जुळले खरच
माझे मलाही नाही कळले 

तुझ्या वचनासाठी ,
तुझ्या माझ्या प्रेमासाठी
जगाच्या रूढीविरुद्ध
कसे जुळले खरच
माझे मलाही नाही कळले 
 
तो मधुचंद्र, ती पुनवेची रात्र
तन जुळली पण मन नाहीत, खरच झाले तरी काय
खरच माझे मला हि नाही कळले
 
बागेत चोरून भेटण्याचा
गोड गोड कॅडबरीच्या
भेटवस्तूंच्या आणि भेट कार्डांच्या
गोड गोड आठवणी
खरच कोठे गेल्या माझे मलाही कळले नाही

तुझे ते हसणे, तुझे ते बघणे, तुझे ते नुसते असणे  
खरच एव्हढे  झाले  तरी काय
काहीच  नाही राहिले
खरच माझे मलाही नाही कळले 

तुझा तो निरागसपणा
तो अल्लडपणा कोठे हरवला
खरच आयुष्यात एकदा तरी प्रेम
कराव का?
खरच माझे मला हि नाही कळले