तान्हा कान्हा

त्याच्या पावलाने घरात आनंद आला

नवीन भविष्याची पालवी फुटली

सर्वांच्या अपेक्षांना पंख फुटले

त्या घरात आनंदाने हर्षोल्हास केला...

त्याने तिला आई बनवले

त्याला बाबा बनवले

त्यांना आजोबा आणि

तिला आजी बनवले

माझा तर पुरता मामाच केला

त्या मामा होण्यात पण

एक वेगळी मजा आहे

त्या इवल्याश्या डोळ्यांचे

त्याच्याकडे काही मागणे आहे

त्या आजी होण्यात पण

एक वेगळी मजा आहे

२५ वर्षां नंतर आता परत

दुपात्याचे गाठोडे बाहेर आहे

त्या आजोबा होण्यात पण

एक वेगळी मजा आहे

एका हातात काठी तर

दुसऱ्या हातात पाळण्याची दोरी आहे

तिच्या आई होण्यात

पूर्णत्वाची मजा आहे

मातृत्व हे स्त्रीचे

सर्वात मोठे लेणे आहे

त्याला बाप झाल्याचा

अभिमान आहे

पण त्याला सांगा

लेका आता बाप झालास

आता बरेच काही करायचे आहे