मला जाऊ द्या ना घरी....

मला जाऊ द्या ना घरी 

आता ट्राफिक हा थांबवा
अहो हवलदार मामा 
अहो इनस्पेक्टर काका         !! धृ !!
टॅक्सी थांबवा ना 
गडे रिक्षा थांबवा ना
ट्रक धावत आला 
आता तोही थांबवा ना, गडे तोही थांबवा ना   !! मला जाऊ द्या ना ...
बाई बाई, बाई बाई , बाई बाई, बाई ‌. ‌....
आली बस शाळेची
आता तीही थांबवा ना
पकडा पोरं टोरं, मला शीळ घालताना 
काही बाही बोलतात , त्याना थांबवाना 
गडे बस थांबवा ना गडे बस थांबवा ना     !! मला जाऊ  द्या ना ....
हवलदार भोळा  
त्याचा माझ्यावरती डोळा
लक्ष त्याचं अर्धवट 
त्याला थांबवा ना , गडे त्याला थांबवा ना   !! मला जाऊ द्या ना ....
जीव माझा धडधडे
पैलवान हा आला 
पळू कशी आता मी 
ट्राफिक आडवा आला , गडे ट्राफिक आडवा आला .   !! मला जाऊ द्या ना ....