जटायु

जटायू

छाटले जरी पंख 
तरी लढलो मी
मुक्त कराया अबला
धारातीर्थी पडलो मी
दिलीस मुक्ती रामा
आभार मानू किती
आता लढणे अशक्य
असंख्य रावण अवती भवति
राजेंद्र देवी