नभ उतरून आले
वाटे कुशीत शिरावे
डोळे मिटताना मग
धैर्याने तुला मिठीतही घ्यावे
जलधारा करी अंग हि चिंब
डोळ्यांनी लाजत
आणि ओठांनी खुणवत
मग तुही मिठीत शिरावे
हृदयातील जाणीव हळूच फुलावी
भावना माझ्या मनातील मग तुलाही कळावी
एक एक थेंब पडतो हळूच
ओठावरून तुझ्या हळूच
कलंडतो माझ्यात
मिठी होते घट्ट
जेव्हा कोसळते वीज
फिरवतो केसांमधून हात
आता कसली ती लाज
जेव्हा वाटे खूप बरसावा
तेव्हा नाही येत हा पारवा
स्वप्न मोडते मग
जेव्हा चहात पडतो हात उजवा
स्वप्नी पाहतो मी तुला खूप
कधी येणार का हे सत्यात
बंधन सारी झुगारून
सामावणार का कधी माझ्या मिठीत