बाप्पा

तूच विनायक तूच विघ्नहार
तूच चिरकाल चिरंतर
तूच भक्तवत्सल मोरेश्वर
तूच निर्गुण निराकार

तू पानाफुलात निसर्गात
तू साऱ्या चराचरात
तू गुणीजनांचा पालक गुणवंत
तूच या विश्वाचा अंत

निराधारांचा आधार तू
असाह्यतेला साहाय्य तू
तुझ्या चरणी मोक्ष आहे
तुझा कृपाशीर्वाद माझ्यावर अनंत आहे

सुखकर्ता परमेश्वर तू
सुखात तू दुःखात तू
मायेचा डोंगर तू
क्षमेचा सागर तू

थकला जीव माझा
झाला पुरे खेळ तुझा
तुझ्या शक्तीने आहे
सर्वकाही शक्य या विश्वात
माझ्या भक्तीचा आता
नको पाहू अंत