आजू बाजूला एवढं घडत असताना
हा आपला चक्क मुका आहे.
जीवनाचं ओझं शिरांवर घेत
जगाच्या गर्दीत ढिम्म पणे उभा आहे.
जगतांना दिसतो तो तसा गर्दीतून
आपल्यातल्यांवर फुंकर घालताना
तो काही बोलत नाही , डोळे बोलतात म्हणे
कारण बिचारा चक्क मुका आहे
काल परवा पर्यंत सगळे त्याला
बहिरा म्हणायचे म्हणे सगळे
हो !पण आज त्याला ऐकायला येतंय
पण बोलेल कसा? तो तर बिचारा मुका आहे
आपलेच अवयव आपल्याच हातांनी वेचत
जुनी खपली काढत खूप रडला तो
रडण्या शिवाय काय करणार म्हणा?
कारण काय बिचारा मुकाच आहे ना!
हे ही काय कमी , निदान आक्रोश तरी केला
कागदाला हात पुसावा तसा, निषेध नाही केला
हे काम आपलं नाही हे माहीत आहे त्याला
अहो का काय विचारता? तो तर मुकाच आहे!.
त्याच्या सहनशक्तीच त्याला कधी सोयर ना सुतक
मर्कटांनी त्याची खूप वाहवा केली
आज तो ऐकतोय , कोणी सांगावं तो बोलेल सुद्धा
हं! आता सांगतो कारण तो मुका आहे.