डिजिटल शब्दांच्या शोधात...

या लेखात मला कॉंप्युटर आणि मोबाईल साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन डिक्शनरी (इंग्रजी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते मराठी) बद्दल सर्वसमावेशक चर्चा (थोडक्यात खऱ्या अर्थाने काथ्याकूट) करायची आहे आणि त्याद्वारे सर्वांचाच फायदा होईल असा मला विश्वास आहे.

तसे या विषयावर लिहिण्याचे कधीपासूनच मनात होते पण वेळही मिळत नव्हता.
पण आता लिहिण्यामागचे तत्कालीक कारण असे की अगदी कालपर्यंत गुगल डिक्शनरी उपलब्ध होती आणि जगातील जवळपास सर्व महत्त्वाच्या भाषांमधील शब्दांचे अर्थ त्यात शोधण्याचा पर्याय उपलब्ध होता.
इंग्रजी ते मराठी साठी सुद्धा आणि तेही अगदी चांगल्या पद्धतीने.
मोबाईल मधल्या इंटर्नेटवरून सुद्धा शब्द शोधणे त्यामुळे सोपे होते कारण गुगलवर युनिकोड मराठी चा वापर असल्याने मोबाईलमध्ये वेबपेजवर मराठी शब्द जसाच्या तसा दिसतो. फॉण्ट डाउनलोड करावा लागत नाही.
युनिकोड पद्धतीने मराठी लिहायला खुप सोपे जाते (मनोगत वर सुद्धा आपण त्याच पद्धतीने लिहितो)
[जेव्हा आपल्याला मराठी शब्दाचा पर्यायी इंग्रजी शब्द शोधायचा असतो तेव्हा पटकन लिहिण्यासाठी खालील लिंक वर जावू शकता- दुवा क्र. १
मी तर म्हणेन की प्रत्येकाने आपापले मराठी फोण्ट विकसीत करून गोंधळ निर्माण करण्यापेक्षा मराठी साठी फक्त एक आणि एकच फॉण्ट म्हणजे युनिकोड म्हणजे फोनेटीक पद्धतीचा सर्वमान्य करावा. ]
तर मी सांगत होतो गुगल डिक्शनरी बद्दल!
ती लिंक होती - दुवा क्र. २
पण काल पासून खालीलप्रमाणे संदेश येतो आहे -
Google Dictionary is no longer available.
You can use Google web search to find definitions or Google Translate for your translation needs.
जर आपण Google Translate वर गेलो तर त्यात भारतातल्या सगळ्या भाषा आहेत, शब्द आणि वाक्ये पण भाषांतरीत करता येतात पण त्यात मराठी मात्र वगळण्यात आली आहे. असे का?
कुणाला कारण माहिती असल्यास येथे सांगू शकता.
तसेच, ऑनलाईन पण युनिकोड पद्धतीचे मराठी असलेली इंग्रजी ते मराठी किंवा मराठी ते इंग्रजी डिक्शनरी आहे का?
असल्यास येथे सांगावे.

तसेच, ऑनलाईन मोफत इंग्रजी ते मराठी डीक्शनरी साठी खांडबहाले (दुवा क्र. ३) हा पर्याय आहे पण, त्यातला मराठी शब्द मोबाईल मध्ये वेबपेज ओपन केल्यावर दिसत नाही कारण त्यांचा स्वतःचा फॉंट आहे. मात्र कॉंप्युटर वर दिसतो.

खांडबहालेंची मोबाईलसाठी ऑफलाईन डिक्शनरी मिळते. तीनशे रुपये देवून कोड विकत घेवून ती अॅक्टीव्ह करता येते.
पण, जर ती काही कारणास्तव मोबाईल फॉरमॅट करावा लागला तर पुन्हा इन्स्टॉल करण्यासाठी परत दोनशे रुपये देवून कोड विकत घ्यावा लागतो.
(दुवा क्र. ४)

मात्र, मोबाईलसाठी इंग्रजी ते इंग्रजी पूर्णपणे मोफत डिक्शनरी हवी असल्यास खाली आहेत. डाउनलोड करून लाभ घ्यावा:
दुवा क्र. ५
दुवा क्र. ६
दुवा क्र. ७

तसेच, आपल्या कॉंप्युटरसाठी संपूर्णपणे मोफत डिक्शनरी हवी असल्या खाली मिळतीलः
मोफत ऑक्सफर्डः
दुवा क्र. ८
मोफत वेबस्टरः
दुवा क्र. ९
मोफत मराठी ते इंग्रजी:
दुवा क्र. १०

मोल्सवर्थ या लेखकाची पीडीएफ स्वरूपातली डिक्शनरी लि़क खाली देत आहे:
लिंक खाली देत आहे:
दुवा क्र. ११

आणखी काही इंग्रजी ते इंग्रजी पीडीएफ-
दुवा क्र. १२
दुवा क्र. १३

वाचकांना विनंती आहे की कुणाला कॉंप्युटर आणि मोबाईल साठी ऑनलाईन आणि ऑफलाईन डिक्शनरी (इंग्रजी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते मराठी) बद्दल आणखी काही माहिती असल्यास येथे सांगावी म्हणजे सगळ्याना त्याचा लाभ होईल.
जास्त करून मोबाईलसाठी इंग्रजी ते मराठी ऑनलाईन किंवा ऑफलाईन बद्दल माहिती असल्यास सांगावे कारण मोबाईल सतत आपल्या जवळ असतो आणि पटकन शब्दाचा अर्थ शोधता येतो.

 - निमिष न. सोनार, पुणे