आरती श्री गावदेवीची

जय जय देवी जय गावदेवी

माझ्या हातून तुझी सेवा घडावी ॥
अंबे तु आता कर गावासी सुखी
हास्य विलासो तुझ्या भक्तांच्या मुखी
आशीर्वाद तु सदा सर्वांना देसी
भक्तांच्या हाकेला त्वरे धावसी ॥       
                जय जय देवी जय गावदेवी
                माझ्या हातून तुझी सेवा घडावी ॥
शक्ती, बुद्धी, सौख्य, सारे तुच देसी
दूष्ट, पापी, यांना शिक्षा तुच देसी
नाम तुझे घेता पाप नष्ट होई
जागृत तु सदैवच आहेस आई ॥
               जय जय देवी जय गावदेवी
               माझ्या हातून तुझी सेवा घडावी ॥
चूकलेल्यांना तुच मार्ग दाविसी
श्रद्धाळूना माते नेहमी पावसी
लेकरू अज्ञानी हे मागते माफी
तारुनी ने नौका पैलतीरासी ॥
                जय जय देवी जय गावदेवी
                माझ्या हातून तुझी सेवा घडावी ॥
॥गावदेवी मातेकी जय॥