तो क्षितिजाअंती जाता
होउनी बिंब दरवळला
आरक्त होउनी बिंदू
मग अंधारात निमाला.
हे रिक्त जाहले आता
नभ मेघांनी भरलेले
घरट्यात परतण्यासाठी
द्विज श्रांत क्लांत झालेले.
या गंधित कातरवेळी
ह घमघमणारा वारा
तारांगणी उमलून आला
मग चमचमणारा पारा .
तो होता तेव्हा मजला
किरणांची होती साथ
दिन झाला आता रजनी
टाकून स्वतःची कात .