बरे नाही

असे चकवणे बरे नाही
तसे भटकणे खरे नाही
जरा वाटली कुठे आशा
असे फ़सवणे बरे नाही
कसे काढले दिवस तेंव्हा
तसे दचकणे खरे नाही
तुझे नाव मी लिहू कोठे
असे गमवणे बरे नाही
कसा स्पर्शलो नको तेथे
असे ठरवणे खरे नाही
उद्या बांधुया कबर माझी
असे रडवणे बरे नाही