मूठ हि पोलादी, मनगटात हि जोर आमच्या
आहे बळ सहस्र गजांचे बाहूत आमच्या
रक्त हे सळसळते कायम रोहिणीत आमच्या
रोखून नजर तयार आहे टाळी देण्या संकटांना आजच्या
लक्ष्य आहे पलीकडे क्षितिजाच्या
उभे आहोत पाय रोखून तळावर सागराच्या
सामावतो हा पूर्ण आसमंत मिठीत आमच्या
शिरावर तळपतो हा सूर्य आमच्या
रेषा नशिबाच्या घट्ट मुठीत आमच्या
दुःख ही सलाम करते धैर्याला आमच्या
शीर हे झुकते श्रद्धेने फक्त पायाशी बाप्पाच्या
हिंमत ही जग जिंकण्याची आहे हृद्यात आमच्या