पाऊस

पाऊस म्हणजे संथ गार वारा
पाऊस म्हणजे भुरळ घालणारे वातावरण
पाऊस म्हणजे कोसळणाऱ्या जलधारा
आणि शांत भिजलेल्या पाऊलवाटा

पाऊस चिंब भिजलेले अंग
वाटे कायम तू मिठीत
कधी भीमसेनचा आलाप
तर कधी मनसोक्त आनंद

डोंगर दर्यांची आठवण
एक गोड साठवण
एक अनुभव फिरण्याचा
मित्रांच्या बिनधास्त साथीचा

पाउस म्हणजे एका हातात तुझा हात
तर दुसऱ्या हातात इराणी चहाचा कप
छान गरमागरम भजी टेबलावर
तुझ्या आठवणींची भुरळ मनावर

ह्या पाऊसात पण नेहमीसारखी
तुझी आठवण आली
आत्ताही तू नव्हती आलीस
तुझी आठवण पुढल्या
पाऊसात पण येईल
आणि कदाचित तेव्हा हि तू नसशील

मन मात्र डोलत राहील तुझ्या स्वप्नात
मन मनाशीच खेळत राहील
तू येशील याची खात्री
मग मन मनालाच देत राहील
पाउस परत पुढल्या वर्षीही येईल