तू म्हणजे नितळ आसमंत
संथ गार वाहणारा वारा
पाउसाच्या कोसळत्या धारा
गर्द रानातील पाऊलवाट
तू म्हणजे कौशिकीचा मल्हार
तू वसंतात येणारा बहर
तू आनंददायी पाहत
तू म्हणजे मनाची घालमेल उगाच
तू म्हणजे मुक्त स्वच्छ हसणे
तुझे बोलणे म्हणजे सनईचे सूर
तुझे असणे म्हणजे स्वच्छंद जगणे
तू खरच आहेस परमेश्वराचे लेणे
तुझा स्पर्श अंग गहिवरणारा
तुझा गंध मोगरा फुलविणारा
तुझे नाक म्हणजे चाफेकळी
आणि तुझी कांती म्हणजे सोनकळी
तू म्हणजे टाळी सुखाला
तू म्हणजे दृष्ट निसर्गाला
ताप तुझ्या बाबांच्या डोक्याला
आणि त्रास मात्र माझ्या मनाला