कधी चालताना, उगा सावलीला, खरे मानले मी !
कुणाचा उसासा, कुणाच्या व्यथेला, खरे मानले मी !
तळाच्या प्रवाहास समजून घेणे न जमले कधीही
कसे भाळलेल्या तुझ्या चेहर्याला खरे मानले मी !
मना या किती खोल जखमा जिव्हारी तुझ्या कारणाने
पुन्हा एकदा कां तुझ्या बोलण्याला खरे मानले मी !
सरींना जरी पाहिले चेहर्याला तुझ्या स्पर्शताना
उगा ओल आल्या तुझ्या पापणीला खरे मानले मी !
सरावी अशी साथ माझी-तुझी कां उरावे दुरावे ?
मुके चालणार्या तुझ्या सोबतीला खरे मानले मी !