वेडा पाऊस...
वेडा वेडा पाऊस
वेड्या वेड्या मनात
सुकलेलं रान
आशेची रुजवात
आसावले मन
कुणाच्या शोधात
थेंबभर ओलावा
दिसे आभाळात
जोर वादळाचा
मेघ गरजतात
येणारच साजण
धकधक उरात
थेंबांची ओंजळ
पृथ्वी पदरात
दोन काळे मेघ
भरून वाहतात
हिरवी नव्हाळी
धरा दिमाखात
वेडे वेडे मन
पाऊस गाणे गात